हिंदी भाषेत 'पराज' म्हणजे 'पवनराज' - सुगंधित पृथ्वी . सर्व सजीवांना जन्म देणारी आणि आपले पालनपोषण करणारी ही सुगंधित पृथ्वीमाता, आदर आणि संरक्षणास पात्र आहे. सेंद्रिय अन्न उत्पादने वापरून आपण केवळ आपल्या पृथ्वीमातेला आदरांजलीच वाहत नाही, तर आपल्या शरीराचेही योग्य पोषण करतो . 'पराज ऑरगॅनिक्स'चेही हेच ध्येय आहे .
पराज ऑरगॅनिक्स हा तुम्हाला सर्वोत्तम सेंद्रिय खाद्य उत्पादने उपलब्ध करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. सेंद्रिय खाद्य उत्पादने आमच्या प्रिय आणि विश्वासू शेतकऱ्यांकडून पिकवली जातात आणि आमच्यापर्यंत पोहोचवली जातात.